मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड मिडीया प्रा.लि.



संचालक ‘प्रमोद प्रभुलकर’ यांनी २००४ साली ‘गोड गुपित’ (मुख्य भूमिका- दिलीप प्रभावळकर, रिमा लागू आणि ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे ७ बालकलाकार विद्यार्थी), आणि ‘फिनिक्स’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, केनियन विद्यार्थी, ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’ची बालकलाकार), २००६ साली ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ (मुख्य भूमिका - भरत जाधव आणि ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’च्या मुंबई, पुणे, सांगली आणि कोल्हापूर सेन्टर्स मधील ५०० विद्यार्थी ), २००९ साली ‘सुंदर माझं घर’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, सुहास परांजपे, राहुल मेहंदळे, मधुराणी प्रभुलकर, विशाखा सुभेदार), २०१९ साली ‘युथट्यूब’ (मुख्य भूमिका - ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे विद्यार्थी कलाकार शिवानी बावकर, पुर्णिमा डे आणि इतर ३०० विद्यार्थी सहकलावंत) अशा मनोरंजक आणि सामाजिक चित्रपटांचे लेखन - दिग्दर्शन केले.

मराठी फिल्म इंडस्ट्रीचा ३० वर्षांचा अनुभव असलेले ‘प्रमोद प्रभुलकर’ यांनी २००२ साली ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीची’ स्थापना केली. आपल्या सर्व चित्रपटांमध्ये ‘प्रमोद प्रभुलकर’ यांनी प्रमुख कलाकार तसेच अनेक छोट्या मोठ्या भूमिकांसाठी आपल्या मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या शेकडो विद्यार्थ्यांना अभिनयाची संधी दिली.

शिवानी बावकर (लागीरं झालं जी), ऋता दुर्गुळे (दुर्वा / फुलपाखरू/ मन उडू उडू झालं ), गिरिजा प्रभू (सुखं म्हणजे नक्की काय असतं...!), किरण गायकवाड (लागीरं झालं जी/ देवमाणूस), निखील चव्हाण (लागीरं झालं जी), स्वरदा ठिगळे (ताराराणी), आकाश शिंदे (सहकुटुंब सहपरिवार) यांच्यासारखे ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे असंख्य विद्यार्थी छोट्या- मोठ्या आणि मुख्य भूमिकांमध्ये आज चित्रपट, टी.व्ही. सिरियल्स, नाटक आणि जाहिरातींमधून अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.

'शिक्षणाची अट नाही', 'वयाची अट नाही', 'दिसण्याची अट नाही', 'अनुभवाची अट नाही' अशी ब्रीदवाक्ये असणारी महाराष्ट्रातील एकमेव ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’ आहे.


दादर, ठाणे, बोरीवली, पनवेल, नाशिक, कोथरूड, चिंचवड, नगर, संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर अशा संपूर्ण महाराष्ट्रात मिळून एकूण ११ ब्रॅंचेस आहेत. या सर्व सेंटर्समधून मिळून ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी दर वर्षी मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमधून अभिनय शिकून बाहेर पडतात.


मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे संचालक ‘प्रमोद प्रभुलकर’ यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार रविवारी हसत खेळत ही लेक्चर्स घेतली जातात.


फक्त रविवारी चालणारा हा अभिनयाचा कोर्स अभिनयाच्या नवरसातील प्रत्येक पैलूचा उलगडा करतो.


नवख्या कलाकारांना अभिनयाचा अभ्यासक्रम अवगत करून देतो. म्हणूनच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये... “आम्ही अॅक्टर्स घडवतो...!” मुंबई, पुणे या दोन्ही शहरात मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीची ऑफिसेस आहेत. जवळपास ४० पेक्षा जास्त स्टाफ मेम्बर्स, ३५ शिक्षक आणि ३००० पेक्षा जात विद्यार्थी या सर्वांचा मिळून आमचा मिरॅकल्सचा एक परिवार तयार होतो.


आजपर्यंत ३००० पेक्षा जास्त विद्यार्थी मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमधून शिकून बाहेर पडले आहेत. आणि आपले अभिनयाचे स्वप्न पूर्ण करत आहेत. तुम्हालाही जर तुमचे अॅक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये आत्ताच अॅडमिशन घ्या...!

आमचे यशस्वी विद्यार्थी



img
img
ऋता दुर्गुळे

झी युवावरील 'फुलपाखरू' मालिकेतील ‘वैदेही’, स्टार प्रवाह वरील 'दुर्वा' मालिकेतील 'दुर्वा' आणि झी टि.व्ही. मराठी वरील ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील ‘दीपिका’. तसेच ‘दादा एक गुड न्यूझ आहे’ या नाटकात काम. ‘स्ट्राबेरी शेक’, ‘अनन्या’, ‘टाईमपास-३’ या चित्रपटांत प्रमुख भूमिका साकारली आहे.


img
गिरिजा प्रभू

स्टार प्रवाहवरील 'सुखं म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेतील 'गौरी' ही प्रमुख भूमिका साकारत आहे.





img
किरण गायकवाड

झी टिव्ही मराठीवरील 'लागिरं झालं जी' मालिकेतील 'भैयासाहेब' आणि ‘देवमाणूस’ मालिकेतील 'डॉक्टर - अजित'





img
दिपकार पारकर

‘तू चाल पुढं’, ‘अबोली’, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘एक महानायक डॉ. भीमराव आंबेडकर’, ‘मेरे साई’, ‘विघ्नहर्ता गणेश’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘दुर्वा’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘सावधान इंडिया’ अशा अनेक टी. व्ही. सिरियल्स, जाहिराती, वेबसिरीज, नाटक, चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.


img
शिवानी बावकर

झी टिव्ही मराठीवरील ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील 'शीतली', 'अल्टी पल्टी', 'लवंगी मिरची' आणि सोनी मराठीवरील 'कुसुम' मालिकेतील 'कुसुम’. ‘युथट्यूब’, ‘दगडाबाईची चाळ’, ‘उंडगा’ या चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.


img
निष्ठा वैद्य

ऋतिक रोशन बरोबर एका डिटर्जंटच्या जाहिरातीत काम केले आहे. सोनी मराठीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेतील 'छोटी जिजा' आणि स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतील 'चोपडाई' या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.


img
निखिल चव्हाण

झी टिव्ही मराठीवरील' 'लागिरं झालं जी' मालिकेतील 'विक्या' आणि 'कारभारी लयभारी' मालिकेतील 'राजवीर'. ‘अत्याचार’, ‘गर्ल्स’, ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘जल्लोष गणरायाचा’ या कार्यक्रमात सुत्रांचालन केले आहे.


img
आकाश शिंदे

स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'ओंकार'


img
पूर्णिमा डे

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' मालिकेतील 'सोनिया' आणि 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'सुषमा' ‘कुण्या राजाची तू ग राणी’ या मालिकेतील मृण्मयी.


img
स्वरदा ठिगळे

सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेतील ‘ताराराणी’, ‘कलर्स मराठी’ वरील ‘माझे मन तुझे झाले’ मालिकेतील ‘शुभ्रा’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली.


img
स्तवन शिंदे

‘झी टीवी’ वरील ‘दिल ढ़ूंढ़ता है’ आणि ‘स्टार प्रवाह’ वरील ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.


img
रोनक शिंदे

झी युवावरील 'फ्रेशर्स' आणि कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका, ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेतील ‘रुद्र’ ही प्रमुख भूमिका त्याने साकारली आहे.


img
शाश्वती पिंपळीकर

स्टार प्रवाहवरील ‘मुरंबा’, कलर्स मराठीवरील ‘चाहूल’, फक्त मराठीवरील ‘सिंधू’ या मराठी मालिकांमध्ये काम तसेच ‘बालक पालक’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


img
तनिष्का विषे

स्टार प्रवाहावरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील ‘दीपिका’, ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘कुसुम’ अशा अनेक मालिकांमध्ये अभिनय सादर केला आहे.


img
प्रियांका देशमुख

‘मिस कल्याण डोंबिवली’ विनर 2021, ‘ झी मराठीवरील 'तू चाल पुढं' आणि स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे', 'रमा माधव' आणि 'सुखं म्हणजे नक्की काय असतं' , ‘सन मराठीवरील’ ‘तुझी माझी जमली जोडी’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे.असतं' अशा मालिकांमध्ये काम केले आहे.


img
पूजा रायबागी

‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेतील ‘कालिंदी’ ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेतील ‘नंदा’


img
बागेश्री निंबाळकर

‘विठू माऊली’ या मालिकेतील ‘सत्यभामा’ ‘सत्यवान सावित्री‘ या मालिकेतील ‘दक्षसेना’ ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न’ या मालिकेतील ‘गौतमी’



img
विपुल साळुंखे

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको', स्टार प्रवाहवरील 'मुरंबा' आणि ‘समांतर’या मालिकांमध्ये काम, 'गिट्स गुलाबजाम' अशा अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.


img
राहुल नेवसे

‘लग्न पहावे करून’, ‘पुणे ५२’, ‘बावरे प्रेम हे’, ‘कॅपचिनो’, ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’, ‘फत्तेशिकस्त’ या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय सादर केला आहे.


img
सचिन देशपांडे

झी मराठीवरील 'हृदयी प्रीत जागते’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘होणार सून मी ह्या घरची’, सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकांमध्ये अभिनय सादर केला आहे.


img
अयान सराफ

'गाथा नवनाथांची' या मालिकेतील 'युवराज (पाटीलचा मुलगा)', लोकमान्य या मालिकेतील 'श्री लोकमान्य टिळक यांचा मुलगा', 'माझी तुझी रेशीमगाठ', 'नवे लक्ष्य' या मालिकांमध्ये अभिनय
अल्बम सॉंग - ओंकार प्रधान (अभंग रिपोस्ट), दर्यावरी


img
त्विशा सराफ

चित्रपट - 'मस्त मैं रेहने का' (OTT प्लॅटफॉर्म) जैकी श्रॉफची शेजारी
अल्बम सॉंग - ओंकार प्रधान (अभंग रिपोस्ट), दर्यावरी



img
चिन्मय रांगणकर

झी मराठी वरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील 'छोटा इंद्र', सोनी मराठी 'गाथा नवनाथांची' या मालिकेतील (श्रीपादवल्लभ यांचा भाऊ) 'अबोली', 'सुखं म्हणजे नक्की काय असतं', 'अबोल प्रितीची अजब कहाणी' या मालिकांमध्ये अभिनय

img
रुद्रांश चोंडेकर

सोनी मराठी चॅनेल वरील 'निवेदिता माझी ताई' या मालिकेतील ‘असीम’, 'कारण गुन्ह्याला माफी नाही'
शॉर्टफिल्म - 'किल्ला'
चित्रपट - 'औरो मैं कहा दम था'
जाहिरात - हल्दीराम,आदिदास,सर्फ एक्सेल मॅटिक

img
आराध्या लवाटे

'योगयोगेश्वर जय शंकर', 'तुझं माझं सपान', 'एकविरा आई' या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.



img
अन्यया पिंगळे

सोनी मराठी चॅनेल वरील 'निवेदिता माझी ताई' या मालिकेतील 'राशी' या भूमिकेत, राज्यस्थरीय बाल नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, पनवेल अटल करंडक पनवेल एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम पारितोषिक