स्पेशल ॲक्टिंग कोर्स

मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या स्पेशल ॲक्टिंग कोर्सचा संपूर्ण अभ्यासक्रम संचालक प्रमोद प्रभुलकर यांनी विचारपूर्वक आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तयार केला आहे.

मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थांच्या मनातून अभिनयाची भीती कमी व्हावी. बिनधास्त प्रेक्षकांसमोर अभिनय सादर करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, म्हणून संचालक प्रमोद प्रभुलकर यांनी पहिले काही लेक्चर्स विद्यार्थ्यांची bonding वाढेल अशाप्रकारे डिझाईन केले आहेत.

अकॅडमीच्या नियमांची ओळख करत सुरु झालेला हा course एक एक करून अभिनयाचे पान उलघडत जातो. रंगभूमीविषयी आवश्यक सर्व माहिती या कोर्सदरम्यान दिली जाते. सर्व लेक्चर्समध्ये निरनिराळ्या activity विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जातात. स्क्रिप्ट वाचन, संवाद वाचन, जिभेचे व्यायाम, घशाचे व्यायाम, ओमकार करायचे विविध प्रकार याविषयी मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक सादरीकरण करून घेतले जाते. आणि अॅक्टर्स घडवले जातात.... म्हणून मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये...., “आम्ही अॅक्टर्स घडवतो...!”

सिलॅबस (अभ्यासक्रम)


खालील सर्व विषयांची माहिती आणि लेक्चरचा आराखडा स्वतः प्रमोद प्रभुलकर यांनी तयार केला आहे.
त्यानुसार स्पेशल अॅक्टिंग कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पुढील विषयांची सविस्तर माहिती दिली जाते आणि प्रॅक्टिकल करून घेतले जाते.


ओरिएंटेशन लेक्चर

ओरिएंटेशन लेक्चरमध्ये मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या नियमांची ओळख करून दिली जाते. मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये कसे वागावे, अभिनय शिकत असताना वेशभूषा कशी असावी, कोणते नियम/ शिस्त पाळावी, तसेच कोर्स विषयीची सविस्तर माहिती इ. गोष्टींचे मार्गदर्शन या लेक्चर मध्ये दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनात कोर्स विषयी किंवा मिरॅकल्स अकॅडमी विषयी कोणत्याही प्रकारची शंका राहत नाही. या लेक्चरमध्ये ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण होते.

इंट्रोडक्शन लेक्चर ( सुख - दुःख )

इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची एकमेकांसोबत ओळख व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना गोलाकार बसवून फक्त नाव, आडनाव आणि एकमेकांची सुख - दुःख सांगितली जातात. त्यामुळे सर्व विद्यार्थी एकमेकांसोबत भावनात्मकदृष्ट्या समरस होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये bonding होते. आणि सर्वांसमोर परफॉर्म करण्याची भीती निघून जाते.



डान्स लेक्चर

डान्स या लेक्चरमध्ये डान्स कोरिओग्राफर विद्यार्थ्यांचे ग्रुप करून डान्स शिकवतो. मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये मोकळीकता यावी, एकमेकांसोबत bonding तयार व्हावे, हसत-खेळत वातावरण निर्माण व्हावे म्हणून डान्स येवो वा ना येवो मज्जा मस्ती करत डान्स हे लेक्चर घेतले जाते.



नवरस लेक्चर

नवरस या लेक्चरमध्ये मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या भावना नवरसातून कशा व्यक्त कराव्यात ते शिकवले जाते. १) शांत रस, २) भय रस, ३) अद्भुत रस, ४) करुण रस, ५) रौद्र रस, ६) शृंगार रस ७) वीर रस, ८) विभत्स रस, ९) हास्य रस हे नवरस प्रत्येकात असतात. रंगमंचावर त्यांचा सुयोग्य वापर करण्याची कला मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवली जाते.


इमॅजिनेशन लेक्चर

इमॅजिनेशन लेक्चरमध्ये मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून एखादे कॅरेक्टर कसे सादर करावे ते शिकवले जाते. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते वृध्द होऊन मरणापर्यंतचा शेवटचा काळ या जीवनचक्रात माणूस कोणत्या वयात कसा वागेल याचे इमॅजिनेशन करून विद्यार्थी ग्रुप करून activity करतात. यामुळे अॅक्टर्सची कल्पनाशक्ती वृद्धिंगत होते.



कॅरॅक्टरायझेशन लेक्चर

कॅरॅक्टरायझेशन या लेक्चरमध्ये मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना शोर्ट फिल्म, फिल्म्स, नाटक, सिरीयल, जाहिरात अशा अनेक माध्यमातून एखादे पात्र सादर करत असताना त्या पात्राची शारीरिक ठेवण (Body language), वाचा (Voice ), स्वभाव (Behavior) या सर्वांचा अभ्यास आणि मार्गदर्शन केले जाते. सोबत विद्यार्थ्यांचे ग्रुप्स करून activity घेतली जाते.



फिजिकल मुव्हमेंट लेक्चर

फिजिकल मुव्हमेंट या लेक्चरमध्ये मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी इमॅजिनेशन आणि कॅरॅक्टरायझेशन या दोन लेक्चरचा वापर करून एक ते दोन वाक्य म्हणत शारीरिक हालचालींचा वापर करून एखादी भूमिका कशी साकार करावी याचा अभ्यास केला जातो. आणि विद्यार्थ्यांचे ग्रुप करून activity घेतली जाते.



व्हॉइस मॉड्युलेशन लेक्चर

मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी फिल्म्स, नाटक, सिरीयल या माध्यमात पात्र सादर करताना त्या पात्रानुसार आवाजामध्ये चढ-उतार तसेच आवाजाची पातळी किती असावी. आवाजातील वैविध्यता, आवाजाचा योग्य वापर याचा अभ्यास व्हॉइस मॉड्युलेशन या लेक्चरमध्ये केला जातो. आणि आवाजाचे/ घशाचे व्यायाम करवून घेतले जातात.


वाचाशुद्धी लेक्चर

संपूर्ण महाराष्ट्रात ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये मिळून एकूण ४१ हजार गावे आहेत. प्रत्येक १२ मैलांवर भाषा बदलते. मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही भाषेत सीन करताना ती भाषा बोलता आली पाहिजे, त्यासाठी वाचाशुद्धीसाठी व्यायाम आणि त्याप्रकारची Activity वाचाशुद्धी या लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते.


व्हॉइस प्रॅक्टिस लेक्चर

व्हॉइस प्रॅक्टिस या लेक्चरमध्ये मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी कॅमेरा आणि स्टेज या दोन वेगळ्या माध्यमात काम करताना, कोणत्या माध्यमात आवाजाची पट्टी किती लावावी, आवाजाची पातळी कोणती असावी, शब्द फेक कशी करावी यासाठी संवाद म्हणून practice करून घेतली जाते.



एकांकिका वाचन लेक्चर

एकांकिका वाचन या लेक्चरमध्ये हातात स्क्रिप्ट आल्यावर ती स्क्रिप्ट कशी वाचावी याची practice करून घेतली जाते. स्क्रिप्टमधील व्याकरण, स्वल्पविराम, पूर्णविराम, अवतरण चिन्ह, प्रश्न चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह इत्यादींचा योग्य वापर करून आवाजात चढ-उतार आणून वाचिक अभिनयातून पात्रं उभं करण्याचा अभ्यास या लेक्चरमध्ये केला जातो.



बोलीभाषा लेक्चर

महाराष्ट्रामध्ये खानदेशी, वऱ्हाडी, कोकणी, मालवणी, घाटी, नागपूरी, अहिराणी, आगरी, पुणेरी इ. भाषा बोलल्या जातात. या भाषांची ओळख बोलीभाषा या लेक्चरमध्ये करून दिली जाते. बाराखडी तीच असते पण विविध भाषा बोलताना कोणता शब्द कशा पद्धतीने बोलला जातो. कोणत्या शब्दावर जोर दिला जातो. कर्ता -कर्म - क्रियापद यांचा वापर कशाप्रकारे केला जातो. म्हणजे थोडक्यात वाचिक अभिनयाचा अभ्यास activity सहित या लेक्चरमध्ये केला जातो.


कॅमेरा अँगल लेक्चर

मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या कॅमेरा अँगल्स लेक्चरमध्ये रंगभूमीच्या प्रशिक्षणाशिवाय कॅमेऱ्या समोरचा अभिनय शिकवला जातो. त्यासाठी प्रमोद प्रभुलकर सरांचे एक खास लेक्चर ठेवले जाते. नाट्यगृहातील अभिनय आणि कॅमेऱ्या समोरील अभिनयातील फरक शिकवला जातो. दिग्दर्शक कॅमेऱ्याचे कोणकोणते अँगल्स वापरतात ते विद्यार्थ्यांना कळल्यामुळे कॅमेऱ्या समोर अॅक्टिंग करणे सोपे जाते.



इम्प्रोव्हायझेशन लेक्चर

फिल्म, नाटक, वेबसिरीज या माध्यमात अभिनय करत असताना स्क्रिप्ट दिलेली असतानाही काहीवेळा दिग्दर्शक सिननुसार स्वतःचे डायलॉग म्हणायला सांगतात. मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना याचा सराव व्हावा म्हणून इम्प्रोव्हायझेशन या लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांचे ग्रुप्स करून विषय दिला जातो व विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करून घेतले जाते.



रिटन ग्रुप सीन लेक्चर

रिटन ग्रुप सीन या लेक्चरमध्ये डायलॉग असलेले छोटे छोटे सीन देऊन ग्रुपमध्ये या सीनचे सादरीकरण करून घेतले जाते. एकत्र टीम करून सहकलाकारासोबत काम करण्याचा अनुभव या लेक्चरमधून मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना दिला जातो.



पाठांतर प्रॅक्टिस लेक्चर

नाटकात, सिरीयलमध्ये काम करताना स्क्रिप्ट मधील मोठ-मोठे उतारे पाठ करावे लागतात. याची मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना सवय व्हावी म्हणून ठराविक वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून उतारा पाठ करून घेतला जातो. काही ट्रिक्स वापरून पाठांतर करणे सोपे कसे करू शकतो याचा अभ्यास या लेक्चरमध्ये केला जातो.


थिएटर / स्टेजचे भान लेक्चर

नाट्यगृहात काम करण्यासाठी नाट्यगृहाविषयी माहिती असणे गरजेचे असते. थिएटर / स्टेजचे भान या लेक्चरमध्ये मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना स्टेजचे भाग, प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत, दिग्दर्शन, विंग्स, ३ घंटा, आणि स्टेजवर वावरताना पाळण्याचे नियम यांचे प्रशिक्षण दिले जाते.



स्कीट – नाट्यप्रवेश लेक्चर

स्कीट- नाट्यप्रवेश या लेक्चरमध्ये छोटे-छोटे Skits तयार करून, अनुभवी दिग्दर्शकाकडून दिग्दर्शित करून त्याचे सादरीकरण केले जाते. त्यामुळे लोकांसमोर न घाबरता परफॉर्म करण्याचा आत्मविश्वास मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो.



कॅमेरा अँगल प्रॅक्टिस शॉर्टफिल्म लेक्चर

कॅमेरा अँगल प्रॅक्टिस शॉर्टफिल्म या लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना लिखाणाची संधी दिली जाते. विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेले सिन्स कॅमेऱ्यासमोर सादर करतात. हे सीन सादर करत असताना कॅमेऱ्याच्या विविध अँगलचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते. ऍक्शन आणि कट यामध्ये विद्यार्थ्यांनी काय करावे, कसे वागावे याचे मार्गदर्शन दिले जाते.


ऑडिशन लेक्चर

प्रमोद प्रभुलकर स्वतः ऑडिशन लेक्चर घेतात. कॅमेऱ्यासमोर कशाप्रकारे स्वतःचे इंट्रोडक्शन देऊन ऑडिशन दिले जाते ते प्रमोद सर सर्व विद्यार्थ्यांना शिकवतात. स्वतः करून दाखवतात.



ऑडिशन प्रॅक्टिस लेक्चर

ऑडिशन देताना ऑडिशनला आलेला विषय, पात्र, तसेच स्वतः विषयी माहिती (इंट्रोडक्शन) याचे अचूक सादरीकरण करणे आवश्यक आहे. ऑडिशन कसे द्यावे? याचे खरेखुरे प्रात्यक्षिक करण्याचा विद्यार्थ्यांना अनुभव यावा म्हणून कॅमेऱ्यासमोर खरी ऑडिशन देण्याचा सराव करून घेतला जातो.